भारत पाकिस्तानच्या संयुक्त बँडचा कार्यक्रम घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मुंबईतील पत्रकार बैठक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. पाकचे सैनिक आपल्या देशात घुसखोरी करुन जवानांची मुंडकी कापून नेतात, पाक दहशतवादी देशाला एक दिवसही शांतपणे झोपू देत नाहीत असे असताना कशाला पाहिजेत बँडची फालतू नाटके? असाच प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाला होता. नियोजित बॅडचाच बॅडबाजा वाजवून शिवसेनेने देशवासियांच्या मनातीलच भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. परंपरेप्रमाणे याला कॉग्रेसने निवडणुक स्टंटचे नाव दिले आहेे. त्याच कॉग्रेस सरकारला पाकप्रेमाचे भरते आल्याने त्यांनी पुन्हा एकदा भारत पाक बससेवा सुरु करण्याचे सुतोवाच केले आहे. पाकला जशास तसे उत्तर द्यायचे सोडून आपले सरकार पाकला लव्हलेटर लिहिण्यातच मग्न असल्याचेच चित्र दिसते.
पाकने आता आपल्या सरकारचे पाणी जोखले आहे. जमीन मऊ लागल्यानेच पाकचे हस्तक आता कोपराने येथील जमीन खणत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन पाकचे कलावंतांना भारतीय रंगमंचावर त्यांची कला सादर करु द्यायची नवी प्रथा काही महाभागांनी पाडली आहे. या प्रकाराला कोणी विरोध केला की कलेच्या प्रांतात राजकारण कशाला आणायचे? असे बोंबलायला हे पाककलावंतप्रेमी मोकळेच असतात. परंतु आपले कलावंत जेव्हा पाकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास जातात तेव्हा मात्र पाकमध्ये त्यांना विरोध होतो. भारतील संगीत क्षेत्रातील ग्यानकोकीळा असलेल्या लता मंगेशकर यांना हा अनुभव आला आहे. इतर कलावंतांचा देखिल अनुभव वेगळा असण्याची शक्यता नाही. मग असे असताना एकतर्फी प्रेम करण्याचा आपण मक्ता घेतला आहे का? म्हणजे पाकने नेहमी आपल्याला कानफटावायचे आणि आम्ही मात्र त्यांना गुलाबाचे फुल द्यायचे. याला राष्ट्रकारण म्हणतात का?
शिवसेनेने योग्य तेच केले. पाक कलावंताचे नशीब म्हणायचे की त्यातल्या कोणी शिवसैनिकांचा मार खाल्ला नाही. हे जे कलावंत असतात त्यांनी कधी तरी भारतावरचे हल्ले थांबवा असे पाकला सांगितले आहे का? पाकचा साधा निषेधही करण्याचे सौजन्य ते पाळत नाहीत. आणि आम्ही त्यांना सन्मान द्यायचा. असतील ते मोठे कलावंत पण ते त्यांच्या देशात! भारतात येऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचा बुरखा घेऊन नखरे केले तर असाच प्रसाद मिळेल हा धडाच काल शिवसेनेने घालून दिला आहे. यापूर्वीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आदेशाने पाक कलावंतानी शिवसेनेचा दणका अनुभवला आहे. आता यावर कॉग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी हा प्रकार म्हणजे शिवसेनेचा निवडणुक स्टंट असल्याचे म्हटले आहे. पाकड्या कलावंताना विरोध करणे हा कोणाला निवडणूक स्टंट वाटत असेल तर त्यावर काय बोलणार? दलवाई साहेबांनी एकदा निवडणुक स्टंट कशा कशाला म्हणायचे याची अधिकृत यादीच एकदा जाहीर करावी. म्हणजे नागरिकांना तरी समजेल की निवडणुक स्टंट कशाला म्हणतात ते? म्हणजे राजकारण कोण करीत आहे ते जनतेला समजेल. आता तरी शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्य असल्याचेच अनेकांचे मत आहे हे नक्की !
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें