बॉलिवुडचा दबंग स्टार सलमान खान याने काल गुजरातच्या मुख्यमंत्र्यासोबत भोजन घेतले. आणि मोदी यांच्याबरोबर पतंग उडविण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला व त्याचे विचार रोखठोकपणे मांडले. नरेंद्र मोदी हे गुडमैन असून देशाचा प्रधानमंत्री चांगला माणूस (अर्थात गुडमैन) बनला पाहिजे असे सलमानने स्पष्टपणे सांगून देखील जनसामान्यांवर प्रभाव असलेल्या बहुसंख्य प्रसारमाध्यमांनी सलमान याने मोदी यांचा पतंग कापला अशा बातम्या देण्यात धन्यता मानली. अप्रत्यक्षरित्या सलमान खान याने मोदी यांनाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी त्याने राजकारणात जी चांगली माणसे आहेत त्यांना मतदान करावे असेही सांगितले. त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. राजकारणात चांगली माणसे बहुसंख्येने यायला पाहिजेत याबाबत कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. आणि नेमकी तीच भूमिका सलमानने त्याच्या स्टाईलने मांडली.
देशात सध्या आम आदमी पक्षाची लाट आहे. याचा अर्थ अन्य पक्षात चांगले लोक नाहीत अशातला भाग नाही. परंतु त्यांना योग्य ती प्रसिध्दी मिळत नाही. काहींचे नशीब प्रसिध्दीच्या बाबतीत कमजोर असते आणि काहींचे जोरात असते. त्यानुसार सध्या केजरीवाल फॉमार्र्त आहेत. सलमान खान त्याच्या जय हो च्या प्रमोशनसाठी गुजरातला गेला होता. तेथे त्याला नरेंद्र मोदी यांना भेटण्याची काहीच गरज नव्हती. परंतु मोदी यांच्या कामाने प्रभावित झाल्यानेच बहुधा सलमानने मोदी यांची भेट घेतली असण्याची शक्यता आहे. तेथे त्यांनी त्याला जे वाटते ते लोकांसमोर मांडले. त्याने आपण दुर्दे:वाने आपण गुजरातचे रहिवासी नसल्याचेही सांगितले. परंतु त्यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. मुस्लिम समाजातूनच काहींनी सलमानने मोदींना गुडमैन म्हटलेले दुर्दे:वी म्हटले आहे. तर काही राजकारण्यांनी सलमानने त्याला दिलेले स्क्रिप्ट वाचून दाखविले असा सूर लावला आहे. कोणी काही बोलले तरी सलमान आणि मोदींना काहीच फरक पडणार नाही. कारण सलमानने व्यक्त केलेले विचार हा आता भूतकाळ झाला आहे. त्यावरुन आता काही दिवस देशात चर्चा सुरुच राहतील.
सलमानने मोदींची स्तुती केल्याने बहुधा आता त्याच्यावर जातीयावादाचा देखिल शिक्का पडू शकतो. सलमान गणेशोत्सवात गणेशाची पूजा करतो यावरुन देखिल यापूर्वी वाद झालेले आहेत. त्यामुळे आताच्या वक्तव्यावरुन वादाचा धुरळा उडाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. बॉलिवुडमध्ये दबंग स्टार म्हणून सलमानकडे पाहिले जाते. तर राजकारणात दबंग नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. काल हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने काहींच्या पोटात मळमळायला प्रारंभ झाला तर त्याला नाइलाज आहे. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचाच सलमानने उपयोग केला आहे हे विसरुन चालणार नाही. मोदींनी सलमानच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रीया न देता शांत राहणेच पसंत केले आहे. परंतु सलमानने जपलेेल्या नमो मंत्राने राजकारणात मात्र वादळ उठलेले आहे हे नक्की!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें