बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान याने गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांाच्यासोबत जेवण काय केले आणि पतंग काय उडविला आणि देशात वादळ उठले. काही महाभागांनी मागणी केली, काय तर म्हणे, सलमानने माफी मागावी. आंध्र प्रदेशातील खासदार असरुद्दीन ओवेसी याने तर कहरच केला. सलमानचा प्रदर्शित होणारा जय हो या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्याने जनतेला केले होते. शिवाय सलमानची नाच्या म्हणून संभावना देखिल केली होती. त्यामुळे जय हो चे काय होणार? याकडेच सार्यांचे लक्ष लागले होते. परंतु जनतेनेच ओवेसीचे आवाहनला केराची टोपली दाखविली. आणि अवघ्या तीनच दिवसात जय हो ने तब्बल 100 कोटींची कमाई केली. आणि ओवेसी आपटला!
नरेंद्र मोदी अशी एकमेव व्यक्ती आहे की, त्यांचे नाव सतत प्रसारमाध्यमांच्यात झळकत असते. त्यांना जेवढे समर्थक आहेत. तेवढेच विरोधक देखिल! अर्थात आता विरोधकांनी संख्या कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. या विरोधकांमधीलच एक म्हणजे खासदार ओवेसी! मध्यंतरी सलमान याने गुजरातला जाऊन मोदींची भेट घेतली व तेथे त्यांच्यासोबत पतंग उडविला, जेवण केले आणि प्रसारमाध्यमांसमोर मोदींचे कौतुक केले. झाले! विरोधकांचे डोके फिरले. आणि त्यांनी सलमानच्या विरोधात आघाडी उघडली. त्यामध्ये अर्थातच ओवेसी महाशय आघाडीवर होते. त्यांनी सरळ आवाहनच केले की, सलमानच्या आगामी जय हो चित्रपटावर बहिष्कार टाका आणि त्याला धडा शिकवा. यावर भाजपाकडून प्रत्युत्तर येणे अपेक्षित होते. परंतु भाजपाने गप्प राहणेच पसंत केले. परंतु सलमानने प्रथमच राजकीय नेत्यांला सडेतोड उत्तर दिले. वास्तविक ओवेसीला देखिल सलमान आपल्याला प्रत्युत्तर देईल ही अपेक्षा नसेल.
खासदार ओवेसी यांच्याबद्दल ज्यांना नितांत आदर आहे अशा ओवेसी समर्थकांनी माझा चित्रपट पाहू नये असे सांगून सलमानने आपण केवळ पडद्यावर नव्हे तर वास्तवात देखिल दबंगच आहोत हेच दाखवून दिले. मिडीयाने देखिल जय हो चित्रपटाच्या विरोधात भूमिका घेतली होती. चित्रपट फ्लॉप झाल्याची आवई त्यांनी उठविली. परंतु सामान्य माणूस केंद्रस्थानी असलेल्या जय हो ला रसिक प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. आणि अवघ्या तीन दिवसात 100 कोटीचा गल्ला गोळा झाला. यातून जनतेने ओवेसीच्या आवाहनाला उचलून आपटल्याचेच सिध्द होते. सलमानने केवळ मोदींची भेट घेतली या घटनेवरुन जर कोणी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. अर्थात ओवेसी समर्थकांनी जय हो पाहिला नाही म्हणून काहीही फरक पडत नाही. परंतु यातून ओवेसीची मानसिकता स्पष्टपणे देशासमोर आली ते एका अर्थी चांगले झाले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें